आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारत राष्ट्राच्या ध्वजाला मानवंदना देत, देशभक्तीपर गीतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय प्रजासत्ताकाच्या उन्नतीसाठी व शाश्वततेसाठी कामना करत देशासाठी झिजलेल्या अथवा प्राणार्पण केलेल्या त्या अनेक देहांप्रति आपण आदर व्यक्त करत असतो. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो अशी मंगलकामना प्रत्येक भारतीयाच्या मनात उत्सुफुर्तपणे निर्माण होते. प्रजासत्ताक दिन चिरायू व्हावा म्हणजे नेमकं काय शाश्वत असणं आम्हाला अपेक्षित आहे? भारतीय भूमी आणि ध्वज? ही भूमी तर आपली जननी आहे, अनादी अनंतच आहे. भूमी वर आधिपत्य गाजवणाऱ्या शासकांसोबतच ध्वजाचे रंग आणि भारत भूमीचा आकार बदलत राहिला. भाषा आणि संस्कृतीनुसार हे भारतवर्ष अनेक राष्ट्रांमध्ये विभागलं गेलं. मात्र ही अनिश्चिततापूर्ण यादवी संपवावीच लागणार होती. राष्ट्राची संकल्पना उमगलेलया जिवंत मनांनी परकीय शक्तींचं उच्चाटन आणि अखंड राष्ट्रचं निर्माण हे उद्देश स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व या बिरुदाखाली एकत्र आणले आणि एका प्रखर संघर्षानंतर भारतीय गणराज्याचा सूर्य जगाच्या क्षितिजावर पुन्हा तळपू लागला. एका ध्वजाखाली एक राष्ट्र एकसंधपणे उभं राहिलं. या भूमीला एक स्थिर नकाशा मिळाला. पण कोणाच्या तरी इच्छेनुसार आणि कोणाच्या तरी इच्छेविरुद्ध ही भूमी पुन्हा विभागली गेली. मग मात्र नकाशा आणि ध्वज आमची अस्मिता बनले. त्या अस्मितेचं रक्षण करण्यासाठी पुन्हा रक्त सांडलं गेलं, आजही सांडत आहोत. भूमीच्या सार्वभौमत्वावर होणारा प्रत्येक प्रहार स्वतःवर घेत लाखो जवान सीमेवर लढताहेत. त्यांच्या सामर्थ्य आणि देशभक्तीच्या जोरावर कदाचित आपण आपली भूमी अबाधित राखू सुद्धा पण आज ६८ वर्षानंतर सुद्धा या प्रजासत्ताकाच्या चिरायु असण्यावर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. कारण भारतीय भूमी शाश्वत आहे पण भारताच्या आणि भारतीयाच्या भारतीयत्वाच्या शाश्वततेचं काय? आमच्याच नकळत आमचा तिरंगा वेगवेगळ्या रंगात विभागाला जातोय कुठल्या तरी जातीचं आणि धर्माचं प्रतीक बनून. तेच रंग प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली त्या त्या रंगाची वादळं उभी करताहेत, जी वादळं आमच्याच स्थैर्याला आणि एकात्मतेला धक्के देत आहेत. ही प्रादेशिक अस्मिता राष्ट्रभावनेला वरचढ ठरू लागली तर? पुन्हा तेच विभाजन, तोच संघर्ष, तोच रक्तपात. इतिहासाची पुनरावृत्ती घडवून आणून चुका दुरुस्त करण्याची आस बाळगणाऱ्या 'बुद्धिमान' मेंदूंना इतिहासानं मोजलेली किंमत चुकवणं शक्य होणार आहे का? कोणत्या एका जाती-धर्माचे , प्रांताचे असण्यापेक्षा आमचं भारतीय असणं आम्हाला जास्त व्यापक बनवू शकतं. इतिहासात घडलेल्या घटनांना वर्तमानातल्या दुःस्थितीसाठी दोष देत बसण्यापेक्षा इतिहासानं दिलेल्या अमूल्य तत्वांना अंगीकारून एक सच्चा भारतीय बनण्याचा आणि अंतर्गत संघर्षांना पराभूत करून हे राष्ट्र एक प्रजासत्ताक म्हणून खऱ्या अर्थाने चिरायू बनवण्यासाठी प्रयत्न करणं श्रेयस्कर ठरेल.
Ashish Prakash Jadhav
Waah! Nice article
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteIt's time to think on it..
DeleteNice
ReplyDeleteThanks
DeleteThanks
Deletekhup chan jar asa prayatna kela tar desh kharya arthane chirayu hoil
ReplyDeleteलेख छान आहे. आज खरच अश्या परिस्थिती निर्माण होत आहेत. त्यासाठीच भारतीयाला भारतीय असल्याची जाणीव करून देणे फार आवश्यक आहे.
ReplyDeleteखूप छान लिहिले आहे .वास्तव उत्तम आणि नेमक्या अशा मांडणीत मांडले आहे.आज जर आपल्या यूवा पिढीने या वास्तवाची जाणीव ठेवली.तर कलामांच्या स्वप्नातला (प्रत्येक भारतीयाच्या मनातील ) भारत नक्कीच घडवू शकू आपण.👍
ReplyDeleteअप्रतिम आशिष....प्रत्येक भारतीयांनी यामधील फक्त सारांश तरी अंमलात आणला तरी भारत नक्कीच चिराय़ू होईल..
ReplyDeleteThank you very much sir
ReplyDelete